Thu. Jan 27th, 2022

रणवीर सिंगच्या गलीबॉय सिनेमाचे “Oscar Award” साठी नामांकन

गली़बॉय सिनेमातून मुंबईतल्या धारावी १७ मध्ये राहणाऱ्या मुरादच्या (रणवीर सिंग) संघर्षाची गोष्ट आहे.

गलीबॉय हा सिनेमा स्ट्रीट रॅपरच्या संघर्षाची गोष्ट आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना फार जास्त भावला. रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या गलीबॉय चित्रपटाची ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री झाली. भारताकडून या चित्रपटाची अधिकृत निवड करण्यात आली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केले आहे. गली़बॉय सिनेमातून मुंबईतल्या धारावी 17  मध्ये राहणाऱ्या मुरादच्या (रणवीर सिंग) संघर्षाची गोष्ट आहे.

या कथेवर आधारित हा सिनेमा

मुराद हा गरिब घरातला असतो. त्या गरिबीवर मात करण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व शोधताना त्याला रॅपची प्रंचड मदत होते. बऱ्याचदा आपले दुःख तो एका वहीत लिहायचा. सफीना(आलिया भट्ट) ही मुरादची लहानपणापासून गर्लफ्रेंड असते तर ती श्रीमंत घरातल्या मुलीचा रोल प्ले करत आहे. यामध्ये  तीला सर्जन व्हायचे असून ती शिक्षण घेत असते तर तिचे वडील डॉक्टर असतात.

दरम्यान मुरादचे वडील दुसरं लग्न करतात. वडीलांनी केलेले हे कृत्य मुरादला मान्य नसते. आईला होणारा त्रास तो पाहत असतो. परंतू वडीलांना काय बोलायची हिमंत त्याच्यात नसते. त्यामुळे प्रत्येक कृत्याला तो मुकपणे होकार देत असतं.
मन मारुन जगणाऱ्या मुरादच्या आयुष्यात अचानक कॉलेजमध्ये एमसी शेर (सिद्धांत चतुर्वेदी) येतो. या दिवसापासून आपणही एमसी शेर व्हावं अशी त्याची इच्छा असते. एमसी शेर रॅपरकडून त्याने प्रशिक्षण घेतले. पंरतू पुन्हा एकदा मुरादच्या नशिबाने त्याला जमिनीवर आणले. त्याच्या वडीलांनी त्याला ड्रायवरची नोकरी करायला लावली.

त्याच दरम्यान त्याची ओळख म्युझिक प्रोग्रामर स्कायशी (कल्की कोचलीन)होते. स्काय, मुराद आणि एमसी शेर एकत्र येऊन एक गाणं रेकॉड करतात. यानंतर मुरादच्या गलीबॉय प्रवासाला सुरुवात होते. यानंतर मुराद आपले रॅप व्हायचे स्वप्न कसे पूर्ण करतो हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *