Thu. Sep 29th, 2022

गुणरत्न सदावर्तेंना ४ दिवसांची पोलीस कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला आहे. दरम्यान, गुरुवारी सातारा पोलीस सदावर्तेंना घेऊन साताऱ्यात दाखल झाले होते. दरम्यान, आज सातारा जिल्हा न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप सदावर्तेंवर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत आले होते. दरम्यान, आता सातारा जिल्हा पोलिसांनी त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदावर्तेंच्या अडचणीत वाढ

अशातच, गुणरत्न सदावर्ते यांच्या अडणीत वाढ झाली आहे. कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.  मराठा आरक्षणासाठी बेकायदेशीररित्या निधी गोळा केली असल्याची तक्रार सदावर्तेंविरोधात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणी सदावर्तेंची चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.