गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गुणर्तन सदावर्ते यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज गिरगाव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणी न्यायालयाने निर्णय दिला असून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गिरगाव न्यायालयावर गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीवर सुनावणी पार पडली असून दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दरम्यान, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच सदावर्ते यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात झाली आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्देंचा जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे
ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता त्यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात साताऱ्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप सदावर्तेंवर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलीस मुंबईत आले होते. दरम्यान, सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे.