Mon. Dec 16th, 2019

गुरमीत राम रहिम दोषी, सीबीआय कोर्टाचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, हरयाणा

 

डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग यांना न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. पंचकुलातील सीबीआय

न्यायालयानकडून शुक्रवारी हा निकाल देण्यात आला. या प्रकरणातील शिक्षेची सुनावणी सोमवार 28 ऑगस्ट रोजी असणार आहे.

 

बलात्कारप्रकरणात बाबा राम रहिम सिंग दोषी आढळल्याने त्यांना सात ते दहा वर्षांचा तुरुंगवास होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दोषी ठरविल्यानंतर हरियाणा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. बाबा राम रहिम सिंग यांच्या अटकेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा

प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पंजाब आणि हरियाणात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

तसेच पंजाब आणि हरयाणातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तर सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

पंचकुला जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. पंजाब आणि हरयाणाच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या

रद्द केरण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *