Fri. Jan 28th, 2022

जाणून घ्या गुरुनानक जयंतीचं महत्व

शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म जरी 15 एप्रिल 1469 रोजी झाला असला तरी देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

गुरु नानक देव! पाचशे वर्षापूर्वी पंजाब मध्ये संत होऊन गेले ज्यांनी अध्यात्मिकतेचा, अद्वैत भाव आणि भक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी बगदाद पर्यंत प्रवास केला. पूर्ण शीख समाज त्यांची जयंती साजरी करतो, हा शिखांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज कार्तिक पौर्णिमा – देव दिवाळी असते. आजच जैनांचे महान तीर्थंकर महावीर यांना आत्मज्ञान प्राप्त झाले.

आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे एका हिंदू कुटुंबात नानक यांचा जन्म झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली.

शीख धर्माची शिकवण-

देवाला हृदयात ठेवा
प्रामाणिकपणे जगा व भरपूर कष्ट करा
सर्वांशी समान वागा
दुसरयांची सेवा करा
दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका.

आज गुरुनानक जयंतीनिमित्त मुंबईतील गुरुद्वारामध्ये फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दादरच्या गुरुद्वारामध्येही शिख बांधवांनी गर्दी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *