Sun. Sep 19th, 2021

26/11 चा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला अटक

26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील लाहोर येथून दहशतवादविरोधी पथकानं त्याला अटक केलीय.

26/11 च्या मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईद याला अखेर पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानातील लाहोर येथून दहशतवादविरोधी पथकानं त्याला अटक केलीय. त्याला सध्या न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

कोण आहे हाफिज सईद?

हाफिज सईद जमात उद दावा आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या

2001 च्या संसदेवर झालेल्या हल्याचा मास्टरमाईंड

2006 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्याचा मास्टरमाईंड

अमेरिकेनं जाहीर केलेल्या जगातील दहशतवादाला कारणीभूत असलेल्या व्यक्तींच्या यादीत हाफीज सईदचा दुसरा नंबर आहे.

अमेरीकेनं जगातल्या 4 अतिरेक्यांवर 1 कोटी डॉलरचा इनाम ठेवलाय त्या चार अतिरेक्यांमध्ये हाफीज सईदचा समावेश आहे.

पाकिस्तानात बसून हाफिज सईद भारताच्या विरोधात सतत काही ना काही कट रचत असतो. त्याच्या संघटना जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तोयबावर 2008 मध्ये संयुक्त राष्ट्रानं बंदी घातली होती. पाकिस्तान सरकारनं अनेकजा हाफिज सईदला अटक केली, पण प्रत्येक वेळी त्याला सोडूनही देण्यात आलं.

भारताच्या आग्रही मागणीवरुन हाफिज सईदच्या विरोधात इंटरपोलनं 2009 मध्ये रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. तरीही तो अजूनही पाकिस्तानात राजरोसपणे फिरत असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *