Sun. Apr 5th, 2020

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि क्रुरकर्मा दहशतवादी राजकारणात उतरण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. राजकारणात उतरण्यासाठी जमात-उद-दावा या संघटनेचं नाव बदलून ‘मिल्ली मुस्लिम लीग पाकिस्तान’ असं नाव करण्यात येणारे. यासाठी त्याने पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे.

सध्या पाकिस्तानात चांगलीच राजकीय उलथापालथ सुरू आहे. पनामा पेपर प्रकरणात दोषी आढळल्यावर शरीफ पंदप्रधान पदावरून पायउतार झालेत, तर, दुसरीकडे तहरीक-ए-इन्साफचे नेते इम्रान खान यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे राजकारणात पाय रोवण्याची हिच खरी संधी असल्याचं ओळखून हाफीज सईद राजकाराणात उतरण्याची तयारी करतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *