मुंबईच्या डबेवाल्यांकडून पूरग्रस्तांसाठी मदतीचे हात
मुंबई डबेवाला असोशिएशन यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे,

सांगली कोल्हापूर मधील पूर परिस्थीती अजूनही कायम आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ज्या गावांत पाणी शिरले त्यातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाऊसाची संततधार अजूनही सुरूच आहे. आर्मी दाखल,नेव्हीची पथके हेलिकॅप्टरसह आज दाखल होणार आहेत. कोल्हापूरचा चहूबाजूंनी संपर्क तुटला आहे. सांगली आणि कोल्हापूर भागात प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यात हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक जन मृत्यूमुखी पडलेले आहेत. अश्या परिस्थिती मध्ये मुंबईच्या दाबेवाल्यांनी या पूरग्रस्त लोकांसाठी धाव घेतली आहे.
सध्या महापुरच्या पाणीपातळीत अपेक्षित घट नाहीये.तर महापुरामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झालं आहे. अनेक लोक पुरात अडकल्याने खाण्यापीण्याचे साहित्य नाहीसे झाले आहे. मुंबई डबेवाला असोशिएशन यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदतीचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे,
मुंबई डबेवाला असोशिएशनच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत
सांगली आणि कोल्हापूर भागात प्रचंड भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यात हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक जण मृत्यूमुखी पडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईच्या डबेवाल्यांनी या पूरग्रस्त लोकांसाठी धाव घेतली आहे.
डबेवाले असोशिएशन याच्या वतीने मदतीसाठी करण्यात आलेले जाहीर आव्हान
१) चांगले कपडे स्री व पुरूष यांच्यासाठी (वापरण्याजोगे असावेत )
२)लहान मुलांचे कपडे ( उबदार असल्यास उत्तम )
३) महिलांना मुलींना लागणारे कपडे साड्या गाऊन ड्रेस
३) वापरण्याजोगे चप्पल व बुट लहान मुले व मोठ्यासाठी
४) ब्लँकेट
५) धान्य (तांदूळ,डाळ, तेल, साखर, गव्हाचे आणि ज्वारीचे पिठ )
६) सुका खाऊ पॅकिंग.. बिस्किटस, चिवडा, फरसाण
या सगळ्या गोष्टी एकत्रित करून मुंबईचे डबेवाले हे सर्व सामान पूरग्रस्तांना देणार आहेत. असे आवाहन करण्यात आला आहे.