Jaimaharashtra news

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा 90 वा वाढदिवस, शुभेच्छांचा वर्षाव

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज 90वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला. लता मंगेशकरांनी त्यांच्या गोड आवाजामुळे भारतातील प्रत्येकाच्या मनात एक जागा केली आहे. लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

God of Cricket सचिन तेंडुलकरने लतादीदींना शुभेच्छा देताना एक व्हिडिओ शेअर केलाय. यात आपण अगदी बालपणापासून तादीदींची गाणी ऐकत कसे वाढलो, याबद्दल मास्टरब्लास्टरने सांगितलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील लतादीदींना  2 Tweets द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

आई, मुलगी, प्रेयसी, बहीण, मैत्रीण,पत्नी ह्या सर्व नात्यांना पडद्यावर ज्या एका अद्भुत आवाजाने गेली ७७ वर्ष घट्ट बांधून ठेवलं त्या लतादीदींचा आज वाढदिवस…. दीदी, तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.@mangeshkarlata #LataMangeshkar pic.twitter.com/55ePXn93Kw
— Raj Thackeray (@RajThackeray) September 28, 2019

लतादीदींचा आतापर्यंतचा प्रवास

लतादीदींनी वयाच्या 9 व्या वर्षापासून गायनास सुरूवात केली. त्यांनी आता पर्यंत 20 भाषेत 50,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. तसेच रंगभूमीवरही त्यांनी काम केले आहे. 1940 मध्ये त्यांना ऑल इंडीया रेडीओकडून आमंत्रण आले. 10 वर्षाच्या असताना त्यांनी रेडीओसाठी रेकॉर्डींग केले. लता मंगेशकर त्यांच्या वडिलांच्या मृत्यू नंतर मुंबईला आल्या. उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायन शिकून १९४६ मध्ये ‘आपकी सेवा में’ या चित्रपटात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले. त्यानंतर  संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यांच्याबरोबर अनेक गाणी गायली.

त्यांना १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने , १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला.

Exit mobile version