Fri. May 7th, 2021

Happy Birthday Madhuri Dixit – धकधक गर्ल ‘हे’ सुपरहिट चित्रपट

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळख असणारी माधुरी दीक्षितचा आज 52वा वाढदिवस आहे. 15 मे 1967 रोजी बॉलिवूडमधील प्रंचड गाजलेली अभिनेत्री माधुरी दीक्षितचा जन्म झाला. आजपर्यंत माधुरी दीक्षितने केलेल्या चित्रपटांमुळे अनेक चाहत्यांची मन जिंकली आहे. अभिनयासह माधुरी दीक्षितच्या डान्ससाठीही लोकं प्रचंड वेडी आहेत. माधुरी दीक्षितला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

धकधक गर्लचे ‘हे’ सुपरहिट चित्रपट –

हम आपके है कौन  –

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट ऑगस्ट 1994 साली प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात निशा ( माधुरी दीक्षित ) आणि प्रेम (सलमान खान) ही भूमिका चाहत्यांना अजूनही लक्षात आहे. या चित्रपटाला 5 वेळा फ्लिमफेअर अवोर्ड मिळाला आहे. तसेच National Film Awardही मिळाला आहे. या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

लज्जा –

राजकुमार संतोषी यांनी लज्जा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चार वेगवेगळ्या महिलांची अनोखी कहाणी सांगणाऱ्या चित्रपटात माधुरी दीक्षितने अभिनय केला आहे. ऑगस्ट 2001 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून एका आगळ्या- वेगळ्या महिलांच्या समस्यांचा उलगडा करणारा चित्रपट चाहत्यांना प्रचंड आवडला. या चित्रपटामुळे माधुरी दीक्षितची वेगळी ओळख निर्माण झाली.

बेटा –

अभिनेता अनिल कपूर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि माधुरी दीक्षित स्टारर चित्रपट बेटा 1992 साली प्रदर्शित झाला. सावत्र आई आणि मुलाची बायको यांच्यातील संबंध दाखवणारा हा चित्रपट आहे. आपल्या सावत्र मुलाच्या संपत्तीवर प्रेम करणारी सावत्र आईचे सत्य दाखवणारी बायको असं या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

गुलाब गॅंग –

गुलाब गॅंग 2014 साली समाजातील विशेष घटकांबाबत बातचीत करणारे तसेच त्यासाठी लढणाऱ्या महिलांवर हा चित्रपट अधारित आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, जूही चावला हा स्टारकास्ट आहे. महिलांवर होणाऱ्या आत्याचारावर लढा देणाऱ्या महिला या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

परिंदा –

1989 साली प्रदर्शित झालेला प्रसिद्ध चित्रपट परिंदा चांगलाच गाजला. अभिनेता अनिल कपूर, नाना पाटेकर यांच्यासह माधुरी दीक्षित चित्रपटात झळकली. या चित्रपटाची कहाणी वेगळी असून गॅंग वॉर या सारख्या गोष्टींचा समावेश आहे. या चित्रपटातील बरेच गाणी चाहत्यांना वेड लावणारी ठरली.

देवदास –

बॉलिवूडमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि चाहत्यांचा आवडता चित्रपट देवदासमध्ये सुद्धा माधुरी दीक्षितचा अभिनय बघायला मिळाला. या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित करण्यात आले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *