Wed. Jun 26th, 2019

#Holi2019: होळीच्या रंगात रंगले गुगल, साकारले ‘हे’ खास डुडल  

12Shares

देशभरात आज धूलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

विविध रंगाच्या रंगात सारे न्हाऊन निघत असताना गुगलने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धूलिवंदन निमित्त खास डुडल साकारलं आहे.

धूलिवंदनाच्या विविध रंगात रंगून गेलेलं डुडल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

दरवर्षी गुगल इंडिया भारताच्या विविध सणांमध्ये आपला सक्रिय सहभाग दाखवताना दिसत आहे.

भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांचे खास डुडल गुगलद्वारे तयार केले जाते.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय सण उत्सवांनाही गुगल डुडलच्या यादीत एका वेगळं स्थान मिळताना दिसत आहे.

यंदाचेही डुडल गुगलने काहीसं हटके ठेवलं आहे. होळीनंतर येणारा धूलिवंदनाचा सण देशाच्या विविध भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या रंगोत्सवाची छोटीशी झलक गुगलच्या डुडलमध्ये दिसत आहे.

भारतात रंगाच्या उत्सवाला मोठं महत्त्व आहे. विशेष करून उत्तर भारतात रंग मोठ्या प्रमाणात खेळले जातात.

म्हणूनच बहुरंगी भारतीय संस्कृतीची झलक गुगलने आपल्या डुडलमध्ये साकारली आहे.

12Shares

Leave a Reply

%d bloggers like this: