Mon. Dec 16th, 2019

‘तू मुझे अच्छी लगती है’ असं तो म्हणताच तिने घेतली धावत्या रिक्षेतून उडी

‘तू मुझे अच्छी लगती है’ अस म्हणत धावत्या रिक्षेत रिक्षाचालकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. केवळ इतकेच नव्हे रिक्षात आरडाओरडा करूनही रिक्षाचालकाने रिक्षा तशीच भरधाव ठेवली  म्हणून घाबरून गेलेल्या तरूणीने चालत्या रिक्षातून उडी मारली. यामध्ये पिडीत तरूणी गंभीर जखमी झाली आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील महाराष्ट्र बॅंकेसमोर एका तरूणीच्या विनयभंगाची घटना घडली.

ही तरूणी रिक्षातून जात असताना अचानक रिक्षाचालकाने तरूणीची छेड काढायला सुरूवात केली.

‘तू मुझे अच्छी लगती है’ असे म्हणत तिचा हात पकडला. घाबरलेल्या तरूणीने रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले.

परंतू, रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली नाही म्हणून तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.

तरीही रिक्षाचालक रिक्षा थांबवत नसल्याने तरूणीने थेट रिक्षातून उडी मारली. यात  डोक्याला आणि हाताला मार लागून तरूणी गंभीर जखमी झाली आहे.

याप्रकारानंतर तरूणी आणि तिच्या आईने पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाच्या विरोधात तक्रार दाखल केली.

आरोपी रिक्षाचालकाचे नाव रवी गोफणे ( वय 22 ) असून तो नाशिकच्या अंबड गावचा रहिवासी आहे.

तक्रार दाखल करताच पोलिसांनी रिक्षाचालक रवी याला अंबड गावातून तात्काळ अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *