टीम इंडियाचा क्रिकेटपटू हरभजन सिंहनं जेट एअरवेजच्या पायलटवर वर्णद्वेषाचा आरोप
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टीम इंडियाचा क्रिकेटपटू हरभजन सिंहनं जेट एअरवेजच्या पायलटवर वर्णद्वेषाचा आरोप केला आहे.
पायलटने विमानप्रवासादरम्यान भारतीय प्रवाशांवर वर्णद्वेषी टिपण्णी आणि शिवीगाळ केल्याचा दावा हरभजन सिंहनं केला.
एवढचं नाही तर सहकारी महिला प्रवाशासोबत गैरवर्तन आणि अपंग प्रवाशाला धक्काबुक्कीही केल्याचा आरोप हरभजननं ट्विटवरून केला.
त्यामुळे अशा पायलटवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी भज्जीने केली.