Mon. Jan 17th, 2022

हरभजन सिंगची क्रिकेटमधून निवृत्ती

भारताचा आघाडीचा फिरकीपटू आणि मोठ्या कालावधीपासून संघातून बाहेर असलेला हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

हरभजन सिंग ४१ वर्षाचा असून त्यांने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २५ मार्च १९९८ रोजी हरभजन सिंगने भारताकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हरभजन सिंग ज्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळत होता, त्या सर्व क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे. आणि आज हरभजन सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

हरभजन सिंगने ट्विट करत सर्व चाहत्यांचे आभार मानले आहे. क्रिकेटने मला सर्वकाही दिले असल्याचे, त्यांनी ट्विट करत म्हटले आहे. तसेच माझा २३ वर्षांचा प्रवास संस्मरणीय बनवल्याबद्दल त्यांनी सर्व चाहत्यांचे ट्विट करत आभार मानले आहेत.

हरभजन सिंगने त्याच्या क्रिकेट खेळाच्या करिअरमध्ये १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी-२० मॅच खेळल्या आहेत. तसेच त्यांनी कसोटी सामन्यात ४१७, एकदिवसीय सामन्यांमध्ये २६९ आणि टी-२०मध्ये २५ गडी बाद केले आहेत. तर आयपीएलमध्ये त्यांनी १६३ सामन्यांमध्ये १५० गडींना बाद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *