रेल्वे लोकलमध्ये प्रवाशाला मारहाण

रेल्वे प्रवाशाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सर्व प्रकार हार्बर रेल्वे मार्गावरील आहे.

या तरुणाला मारहाण करणाऱ्या तिघांना प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. रेल्वेतील प्रवाशांनी या तिघांना खारघर रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

मारहाण करण्यात आलेल्य तरुणाला बेलापूर स्थानकात उतरायचं होतं. परंतु या तरुणाला या तीनही तरुणांनी उतरण्यासाठी जागा दिली नाही. यावरुन यांच्यात वाद झाला.

वादानंतर हाणामारी करण्यात आली. दरम्यान या सर्व प्रकाराचा खारघर पोलीस अधिक तपास करत आहे.

Exit mobile version