‘हार्दिक’ अभिनंदन… BCCIकडून हार्दिक, राहुलचं निलंबन मागे

टीम इंडियाचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि एल. राहुल यांच्यावरील निलंबनाची कारवाई BCCIने मागे घेतली आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू आता न्यूझीलंडशी सुरू असणाऱ्या सामन्यांमध्ये खेळू शकतील.

‘Koffee With Karan’ शो मध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे  हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांचं निलंबन करण्यात आलं होतं. मात्र आता बंदी उठवण्यात आली आहे. CoA ने हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. ही बंदी तत्काळ उठवण्यात आली असून लवकरच New Zealandच्या उर्वरीत सामन्यांत दोघेही खेळणार आहेत.

संबंधित बातम्या- मी देखील तितकाच दोषी! राहुल-हार्दिकच्या प्रकरणावर अखेर करण बोलला…! 

काय होतं प्रकरण?

हार्दिक पांड्या आणि के एल राहुल दोघांनी ‘Koffee With Karan’ शो मध्ये महिलांसदर्भात आक्षेपार्ह विधान केली होती.

त्यामुळे त्यांच्यावर Social Media वरून टीकेची झोड उठली होती.

BCCI च्या प्रशासकीय समितीने प्रकरणात लक्ष घालत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

अमिकस क्युरी पी एस नरसिंह यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर CoA ने त्यांच्यावरील बंदी तत्काळ उठवण्याचा निर्णय घेतला.

पांड्या आणि के एल राहुलवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

संबंधित बातम्या-निलंबनानंतर हार्दिकने स्वतःला खोलीत कोंडून घेतले

 

Exit mobile version