टीम इंडियाच्या या खेळाडूचा उरकला साखरपुडा

टीम इंडियाच्या ऑलराऊंडर खेळाडूने वर्षाच्या पहिल्याच दिवशी साखरपुडा उरकला आहे. हार्दिक पांड्याने अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅन्कोविक सोबत साखरपूडा उरकला आहे.

हार्दिक पांड्याने याबद्दलचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये हार्दिक आणि नताशा एकत्र आहेत. या दोघांनी बोटमधील फोटो शेअर केला आहे.

या फोटोत नताशा साखरपुड्याची अंगठी दाखवत आहे. “मे तेरा, तु मेरी जाने सारा हिंदुस्तान” असे कॅप्शन हार्दिकने या फोटोला दिले आहे.

हार्दिक पांड्याच्या 26 व्या वाढदिवसानिमित्ताने नताशाने हार्दिक सोबतचा फोटो शेअर केला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या संबंधाची चर्चा होती. त्यामुळे आता या चर्चांना अखेरीस पूर्णविराम लागला आहे.

हार्दिकचे या आधी बॉलिवूडमधूील अनेक अभिनेंत्रीसोबत नाव जोडले गेले होते. यामध्ये इशा गुप्ता, उर्वशी रौतेला तसेच एली अवराम या अभिनेंत्रीसोबत नाव जोडले गेले होते.

नताशाने स्टॅन्कोविकने 2013 साली सत्याग्रह या सिनेमातून पदार्पण केले होते. नताशा बिग बॉस 8 व्या पर्वात सहभागी झाली होती.

नताशाने ‘नच बलिये’ या रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. नताशाने अर्जून रामपालच्या ‘डॅडी’ सिनेमाची एक भाग होती.

तसेच ‘फुकरे रिटर्न्स’ सिनेमातील ओ मेरी मेहबूबा या गाण्यावर थिरकली होती.

Exit mobile version