Fri. Jun 21st, 2019

हार्दिक पांड्या पुन्हा एकदा होतोय ट्रोल, नेटकरी विचारतायत तिथे ‘कॉफी’ होती का ?

89Shares

लोकप्रिय टीव्ही शो Koffee with Karanमध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर हार्दिक पांड्या आता  पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर अनेक नेटेकऱ्यांनी हार्दिकला ट्रोल केलं आहे.

हार्दिक पांड्याने एमएस धोनी, शुभमान गिल, केदार जाधव आणि कृपाल पंड्या यांच्याबरोबर जेवण करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या फोटोला नेटेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. हार्दिकने 2 दिवसांपूर्वी हा फोटो पोस्ट केला होता.

त्या पोस्टला कमेंट करत तिथे कॉफी आहे की नाही? असा प्रश्न नेटेकऱ्यांनी विचारला.

महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हार्दिकने माफीही मागीतली होती. मात्र नेटकऱ्यांनी केलेल्या या प्रश्नानंतर लोकांनी काही त्याला माफ केलेलं दिसत नाही.

‘Koffee With Karan’ लोकप्रिय टीव्ही शोमध्ये महिलांसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हार्दिक पाड्यांला भारतीय संघातून काही काळासाठी वगळण्यात आले होते, मात्र नंतर निलंबन मागे घेण्यात आले.

त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने पुनरागमन केले.

 

89Shares

Leave a Reply

%d bloggers like this: