Tue. May 17th, 2022

चिंतन शिबिराला हार्दिकची दांडी

आजपासून काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराला सरुवात झाली आहे. राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवसीय चिंतन शिबिर होणार आहे. मात्र, या चिंतन शिबिराला काँग्रेसचे दोन नेते अनुपस्थित राहिले आहेत. काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल तसेच काँग्रेस नेते कपिल सिब्बल अनुपस्थित राहिले आहेत.

काँग्रेसच्या चिंतन शिबिराला काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आले नाही. मात्र, काँग्रसच्या दोन नेत्यांना आमंत्रण देऊनही त्यांनी चिंतन शिबिराला गैरहजेरी लावली आहे. चिंतन शिबिराला हार्दिक पटेल यांनी दांडी मारली. तसेच, कपिल सिब्बलसुद्धा चिंतन शिबिरापासून दूर राहिले आहेत. त्यामुळे आता हार्दिक पटेलची नाराजी काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शुक्रवारपासून काँग्रेसचे चिंतन शिबिर

शुक्रवारपासून होणाऱ्या चिंतन शिबिरात प्रत्येक राज्याचा आढावा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि काँग्रेस या विषयावरसुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे. या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात महत्त्वाच्या सहा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. त्यासाठी देशभरातील काँग्रेसचे नेत्यांची कमिटीही तयार करण्यात आलेली आहे. दरम्यान, चिंतन शिबिरासाठी महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री यशोमती ठाकूर तसेच आमदार प्रणिती शिंदे आणि इतर सचिव उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.