अन् माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची हौस पूर्ण, व्हिडीओ व्हायरल
जय महाराष्ट्र न्यूज, इंदापूर
मंगल कार्यालयासमोर नवऱ्याची परतण्याची वेळ. घोड्याचं तालबद्ध नाचणं. हे गावाकडच्या लोकांना पाहणं नेहमीचं असतं. पण, त्या घोड्यावर बसलेला नवरदेव नसून जर एखादा माजी मंत्री असेल तर अशीच घटना इंदापूर तालुक्यात घडली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घोड्यावर बसण्याचा मोह आवरला नाही. मगं काय नवरदेवाच्या ऐवजी पाटलांनीच घोड्यावर बसून ठेका धरला. अन् हर्षवर्धन पाटलांची हौस पूर्ण झाली.