Sun. Oct 17th, 2021

हरियाणात युवतीवर सामूहिक अत्याचार

हरियाणाच्या पलवल जिल्हामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका तरुणीचे अपहरण करुन, तिच्यावर २५ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितवर रामगढमधील जंगलात हे दुष्कृत्य करण्यात आले असून, याप्रकरणी मुख्य आरोपी सागरला अटक करण्यात आली आहे. फेसबुकवर मैत्री करुन युवतीला ओढले जाळ्यात पोलिसांना दिलेल्या जबाबात पीडितेने सांगितले, की तिच्या फेसबुक मित्राने (सागर) तिला भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी ती त्याला भेटण्यासाठी गेली असता; सागर, त्याचा भाऊ आणि त्याच्या काही मित्रांनी मिळून तिचे अपहरण केले. यानंतर तिला रामगढच्या जंगलामध्ये नेऊन रात्रभर तिच्यासोबत दुष्कर्म करण्यात आले. तिच्यावरचे अत्याचार इथेच नाही थांबले, तर सकाळी तिला एका भंगारवाल्याच्या दुकानात नेऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्यात आला. यानंतर तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर, तिला त्याच परिस्थितीत बदरपूर सीमेवर सोडून आरोपी फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी २५ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ मे रोजी घडली होती, मात्र पीडिता पोलिसांकडे जाण्याच्या स्थितीत नव्हती. त्यामुळे १२ मे रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी सागरला अटक केली आहे तर, इतरांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *