तरुणीचा पाठलाग करणाऱ्या भाजप नेत्याच्या मुलाला अखेर अटक
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
हरयाणामध्ये तरुणीचा पाठलाग करणाऱ्या विकास बरालाला अखेर चंदिगड पोलिसांनी अटक केली आहे.
विकासला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अटक केली. विकास बराला हा हरयाणातील भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा आहे.
गेल्या आठवड्यात रात्री विकास बराला आणि त्याचा मित्र आशीष कुमार या दोघांनी एका तरुणीचा पाठलाग केला होता. पीडित तरुणीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी दोघांना अटकही केली. मात्र जामीनावर दोघांना सोडण्यात आलं होतं. नंतर विकासने पीडितेचा पाठलाग केल्याचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळालं होतं.