Fri. May 7th, 2021

‘या’ शाही गाढवाची किंमत चक्क 10 लाख, कारण…

एकीकडे देशात गाढवांची संख्या कमी होत असल्याची समस्या निर्माण होत असतानाच, दुसरीकडे मात्र एक गाढव आपल्या प्रजननक्षमतेसाठी चांगलंच डिमांडमध्ये आहे. बैल किंवा घोड्यांएवढी घसघशीत किंमत या गाढवाची आहे. हे गाढव कुणाला विकत घ्यायचं असल्यास 10 लाख रुपये तयार ठेवा. या गाढवाचा खुराक आणि थाटही तसाच शाही आहे. हरियाणातील सोनीपत येथील ‘टिपू’ नावाचं गाढव अनेक दिवसापासून लोकांच्या आकर्षणाचा भाग बनलंय. आपलं टिपू गाढव वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं मालक राजसिंहचं म्हणणं आहे. अशी काय आहे या गाढवाची खासियत?

‘टिपू’ गाढवाचं वैशिष्ट्य!

टिपू गाढव आपल्या प्रजननक्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.

ब्रीडिंगसाठी या गाढवाला मोठी मागणी आहे.

हरियाणातल्या सोनीपतमधल्या टिपू गाढवाला ब्रीडिंगसाठी हिमाचल, उत्तराखंड, उत्तर प्रदेश अशा इतर राज्यांमध्येही ब्रीडिंगसाठी बोलावलं जातं.

टिपू गाढवाचा मालक राजसिंह आपल्या गाढवाच्या एका ब्रीडिंगचे  10 हजार रूपये घेतो.

पण या गाढवावर खर्चदेखील तितकाच करावा लागतो. कारण या टिपू गाढवाचे नखरे काही कमी नाहीत. त्याची चांगली बडदास्त ठेवावी लागते.

टिपू गाढवाचा खुराक!

टिपू गाढवाला रोजच्या आहारात 5 किलो हरभरे, 4 लिटर दूध आणि 20 किलो गवत द्यावं लागते.

जेवणानंतर स्वीट डिशही त्याला हवी असते.

टिपूला गोड लाडू आवडतात.

त्याला लाडू खायला मिळाला नाही तर त्याचा मूड चांगला राहत नाही.

टिपू गाढव आहेदेखील तगडं. सामान्य गाढवांपेक्षा टिपू  7 इंच जास्त उंच आहे.

एकूण किती खर्च रोज गाढवाला लागतो ?

गाढवाचा रोजचा खर्च एक हजार एवढा आहे.

सकाळ आणि संध्याकाळ गाढवाला फिरायला न्यावे लागते.

बाहेर नेल्यावर मात्र ते सामान्य गाढवांप्रमाणेच जमिनीवर लोळते.

गाढवाला उन्हाचा त्रास सहन होत नसल्याने त्याच्या तबेल्यात चोवीस तास पंखा लावावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *