Sat. May 25th, 2019

‘पोलीस मला नाईटीमध्येच उचलून घेऊन गेले!’, हसीन जहाँचा आरोप!

0Shares

टीम इंडियाचा खेळाडू महंम्मद शामी आणि त्याच्या पत्नीमध्ये असलेला बेबनाव वारंवार समोर आला आहे. शामीची पत्नी हसीन जहाँ हिने आपल्या पतीवर आणि सासरच्या मंडळींवर अनेक गंभीर आरोप आत्तापर्यंत केले आहेत. यावेळी तिने पोलिसांवरही आरोप केले आहेत.

काय आहेत हसीन जहाँचे पोलिसांवर आरोप?

28 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता आपण मुलगी आयशा आणि तिच्या आयाला सोबत घेऊन सहसपूरला शामीच्या घरी गेलो होतो.

तिथे सासरच्या मंडळींसोबत जोरदार भांडण झालं.

सासरच्या मंडळींनी महंम्मद शामीला फोन करून या प्रकाराची कल्पना दिली.

आपण आपल्या मुलीबरोबर बेडरूममध्ये गेलो होतो.

रात्री 2 पोलिसांनी येऊन बेडरूमचं दार ठोठवायला सुरूवात केली.

दार उघडताच आपला हात धरून पोलिसांनी बाहेर ओढलं.

यावेळी माझा मोबाईल काढून घेण्यात आला.

मी त्यावेळी फक्त नाईटीमध्ये होते आणि मला कपडेही बदलू दिले गेले नाही.

मला तसंच नाईटीमध्ये जीपमध्ये बसायला सांगून पोलीस स्टेशनला नेण्यात आलं, असा आरोप हसीन जहाँने केला आहे.

मुलीलाही पोलिसांकडून शिवीगाळ!

हसीन जहाँने यासंदर्भात देवेंद्र कुमार आणि के.पी. सिंह यांच्याविरोधात तक्रार केली आहे. एवडंच नव्हे, तर आपली मुलगी आयशा हिला जबरदस्ती जिल्हा रूग्णालयात नेऊन तेथे एका कागदावर तिचा जबरदस्ती अंगठा घेतला गेल्याचीही तक्रार हसीन जहाँने केली आहे. आपल्या मुलीला शिवीगाळ करून एका ठिकाणी कोंडून ठेवल्याचाही आरोप तिने केला आहे.

हसीन जहाँच्या या आरोपानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक अविनाश चंद्र हे याप्रकरणी तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *