Sun. Jun 20th, 2021

तुम्ही ‘अमित शाह’ आंबा खाल्लात का ?

आंब्याचा सीझन संपण्याच्या मार्गावर असताना एक नविन आंबा बाजारात दाखल होणार आहे. लखनौच्या मलिहाबाद येथे आंबा उत्पादक हाजी कलामुल्लाह दरवर्षी आंब्याची निर्मिती करत नामकरण करतात. हाजी कलामुल्लाह यांनी संकरातून नव्या आंब्याची निर्मिती करतात आणि त्या आंब्यांना सेलिब्रिटींचे नाव देतात. यंदा त्यांनी आंब्यांना ‘अमित शाह’ म्हणून नाव दिले आहे.

बाजारात येतोय शाह आंबा !

सेलिब्रिटी आंबा उत्पादक हाजी कलामुल्लाह यांनी एका नव्या संकरातून आंबा उत्पादन केला आहे.

वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या नावाने आंबा उत्पादन करणाऱ्या हाजींनी यंदा आंब्याचे  नाव  ‘शाह’ असे ठेवले आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सन्मानार्थ शाह आंबा असे नाव दिले आहे.

त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची लोकांना एकत्र आणण्याच्या क्षमतेवर प्रभावित होऊन नाव दिल्याचे हाजींचे म्हणणे आहे.

अमित शहा आंबा हा कोलकाताच्या हुस्न ए आरा आणि लखनौच्या फेमस दशेरा यांच्या संकरातून बनला आहे.

या आंब्याचे वजन आणि चव उत्तम प्रकारचे असून तो लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

कित्येक वर्षांपासून वेगवेगळ्या प्रजातींच्या आंब्यांचे उत्पादन करणाऱ्या  हाजी कलामुल्लाह यांना केंद्र सरकारने पद्मश्री देऊन गौरविले आहे.

2015 साली हाजींनी त्यांच्या आंब्याला नरेंद्र  मोदींंचे नाव दिले होते तर या आधी  ऐश्वर्या राय, सचिन तेंडूलकर असे नाव दिले होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *