Mon. May 10th, 2021

एक हेअर कट ऐसा भी! ‘अशी’ हेअर कटिंग स्टाईल तुम्ही पाहिलीत का ?

एक अवलिया ऐसा भी ! सगळ्यांनाच स्टाईलमध्ये राहण्याची आवड असते. कपड्यांपासून अगदी चपलांपर्यंत टिप-टॉप राहण्याची आवड असते. मात्र अनेक प्रकारचे हेअरस्टाईल करण्यासाठी लोकं अनेक गोष्टी करत असतात. हायलायटिंग, हेअर स्ट्रेटनिंग असे विविध प्रकारचे प्रयोग करताना दिसतात. मात्र पिंपरी चिंचवडमधील एका अवलियाने चक्क एकाचवेळी हातात आठ कात्री घेऊन हेअर स्टाईल करत असल्याचे समजते आहे. त्यात विशेष म्हणजे फक्त आठ कात्र्याच नाही तर लायटर आणि मेणबत्तीच्या आगीने हेअर सेटिंग करत आहे.

असा करतो हेअर सेटिंग –

पिंपरी-चिंचवडमध्ये सलून मालक चक्क आठ कात्र्या घेऊन हेअरकट करत असल्याचे समजते आहे.

एवढच नव्हते तर कटिंग झाल्यावर हेयर सेटिंग करण्यासाठी हा अवलिया लायटर आणि मेणबत्तीच्या आगीचा वापर करतो.

प्रशांत यांच्या या हटके स्टाईलमुळे लोकं मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून 2-3 दिवसांपूर्वी हेअर कटिंगसाठी बुकींग करावी लागत असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे.

प्रशांत यांच्या आगळ्या-वेगळ्या स्टाईमुळे सलून पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहे.

कोण आहेत प्रशांत खरे ?

प्रशांत खरे सलूनचे मालक असून या आगळ्या-वेगळ्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत.

प्रशांत यांनी हेअर स्टाईल ऍण्ड कटिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.

आठ कात्रींच्या सहाय्याने हेअर कटिंग करणे आणि मेणबत्ती किंवा लायटरच्या आगीने हेयर सेटिंग करणे प्रशांत यांची स्वत: तयार केलेल्या स्टाईल आहेत.

ही स्टाईल प्रत्येक सलूनमध्ये पोहोचावी अशी प्रशांत यांची इच्छा आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *