Mon. Feb 24th, 2020

कबुतराच्या अंड्याचं ऑम्लेट खाल्ल्यावर ‘त्याची’ आत्महत्या!

पुण्यामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. तरुणाने गॅलरीत असलेल्या कबूतराच्या घरट्यातील अंड्याचे ऑम्लेट करून खाल्ले, त्यावर मद्यप्राशन केल्यानंतर आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

अर्णब (तुहीन) मुखोपाध्याय असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मयत तुहीन हा मूळचा बंगालचा आहे. विमाननगर परिसरातील एका इमारतीत तो पत्नीसह भाड्याने राहत होता. वोडाफोन कंपनीत तो कामाला होता.

मंगळवारी रात्री कामावरून परत आल्यानंतर त्याने घरातील बाल्कनीत असलेल्या कबुतराच्या घरट्यातील अंडी काढून त्याचे आम्लेट करून खाल्ले. आणि त्यावर मद्यप्राशन केले. यानंतर काही वेळातच तो विचित्रपणे वागू लागला. घरातच इकडून तिकडे धावत होता. त्याच्या पत्नीने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने बाल्कनीत जाऊन आठव्या मजल्यावरून थेट उडी मारली.

पत्नीने ही माहिती शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *