Wed. Aug 10th, 2022

आरोग्यासाठी सफरचंद हे फळ फायदेशीर

मुंबई : इंग्रजीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘An Apple keeps doctor away’ अर्थात ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला दूर ठेवता येते’सफरचंद हे आरोग्यासाठी फायदेशीर असून सफरचंद खाल्यानं आरोग्य सुधृढ आणि निरोगी राहते. दररोज सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. सफरचंदमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह असल्यानं शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता उद्भवत नाही. तसेच सफरचंदामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी असते जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. डॉक्टरांपासून पौष्टिक तज्ज्ञांपर्यंत सफरचंद खाण्याचा सल्ला देतात.

सफरचंद खाण्याचे नेमके फायदे आणि त्यातील गुण खालीलप्रमाणे

१) एनिमिया पासून बचाव :- सफरचंद मध्ये मोठ्या प्रमाणात ‘लोह’ असल्याने एनिमिया सारख्या आजारावर ते रामबन इलाज ठरले आहे. रोज २-३ सफरचंदे खाल्ल्यास शरीराची संपूर्ण दिवसाची लोहाची गरज पूर्ण होते.
२) पचनक्रियेस मदत करते :- सफरचंदमध्ये मोठ्या प्रमाणात ‘फायबर’ असते जे पचनशक्ती वाढण्यास मदत करते. सफरचंद जर सालीसह खाल्ल्यानं कफ बरे होते.
३ ) कॅन्सर चा धोका कमी होतो :- सफरचंदमधील क्वरसिटीन पेशींना होणाऱ्या नुकसानापासून वचविते. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
४) मधुमेहापासून बचाव :- सफरचंदमधील ‘पेक्टिन’ जे शरीरातील ग्लाक्ट्रॉनिक आम्लाचीची गरज पूर्ण करते आणि इन्सुलिनचा वापर करणेही कमी करते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.