Fri. Sep 30th, 2022

किवी हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर

मुंबई : किवी ह्या फळात कमी कॅलरीज असून हे पौष्टिक फळ आहे. किवीमध्ये फोलेट आणि पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असतात. किवी खाल्ल्यानं पाचन शक्तीत वाढते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल देखील किवी नियंत्रित ठेवते.

किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. किवीमुळे हार्मोन्स शांत होतात. त्यामुळे शांत झोप लागते. किवीमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यामुळे किवी हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

किवीचे फायदे

१ किवीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
२ किवीमध्ये व्हिटॅमिन ई आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असतात.
३ किवी हे त्वचेसाठी फायदेशीर
४ किवीमुळे आरोग्य सुधारते.
५ किवी त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
६ त्वचेची कांती सुधारते.

७ किवी फळामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारते.

८ किवी खाल्ल्याने संधिवाताची समस्या या दूर होतात.

९ किवी आमवात, दमा या रोगांवर गुणकारी आहे.

१० मधुमेह रूग्णांसाठी किवी अत्यंत फायदेशीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.