Jaimaharashtra news

भेंडीची भाजी खाल्यानंतर या चूका करू नका!

भेंडीची भाजी फार चविष्ट असते त्यामुळे लोक भेंडीची भाजी आवडीने खातात. भाज्यांमध्ये महत्त्वाची भाजी म्हणजे भेंडीची भाजी. भेंडीची भाजी ही वेगवेगळ्या राज्यात वेगळ्या पद्धतीने बनवून खातात. भेंडीची भाजी आपल्याला अनेक प्रकारे तयार करता येते. भेंडीमध्ये विटॅमीन सी, विटॅमीन ए, फायबर, पोलेट, कॅल्शियम, मॅग्निशिअम असे महत्वाचे पौष्टिक तत्व आणि घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे भेंडीची भाजी खान फार गुणकारक आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी भेंडीची भाजी ही खूप महत्त्वाची आहे. मात्र जेवढी भेंडी आरोग्यासाठी चांगली आहे तेवढीच या दोन गोष्टीचे सेवन केल्यानंतर घातक ठरू शकते. कारल्याची भाजी – भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यानंतर कारल्याची भाजी खाल्यास पोटात घातक विष हे तयार होऊ शकते.ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि आपण आजारी पडू शकतो. भेंडीनंतर कारले खाणे हे हानीकारक आहे. मुळा – भेंडीच्या भाजीचे सेवन केल्यानंतर मुळा खाणे हे देखिल आपल्या शरीरासाठी घातक आहे. भेंडीनंतर मुळा खाल्याने त्वचाच्या संबंधित रोग आपल्याला जडू शकतात. चेहऱ्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे भेंडीसोबत किंवा भेंडीची भाजी खाल्यानंतर मुळा खाणे शरीरीसाठी घातक ठरू शकते. भेंडी खा मात्र भेंडी खाण्यापुर्वी या दोन गोष्टी स्मरणात असू द्या.

Exit mobile version