Jaimaharashtra news

दररोज संत्री खाण्याचे भरपूर फायदे

मुंबई : फळे खाणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. आरोग्य सुधृढ आणि निरोगी राहण्यासाठी फळ खाणे आवश्यक आहे.फळांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पौषक तत्वांनी भरपूर असलेले फळ म्हणजेच संत्रे. दररोज संत्रे खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. संत्र्यात व्हिटामिन सी असल्यानं संत्री ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

संत्रे खाण्याचे फायदे

1. रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

2. वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात.

वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा चांगली होते.

३. संत्र्यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते.

४ चेहऱ्यावरील सुरकत्या या संत्रीमुळे नाहीशा होतात.

५. रोज संत्रे खाल्ल्याने हृदयरोगाशी संबंधित हार्ट अॅटॅक तसेच इतर आजारांचा धोका कमी होतो.

६. संत्र्यातील फोलेट आणि फॉलिक अॅसिडमुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. गरोदर स्त्रियांनीही नियमित संत्रे खाणे चांगले.

Exit mobile version