Mon. Oct 25th, 2021

आरोग्यसाठी चिक्कू हे फायदेशीर….

मुंबई : चिकू हे फळ अगदी आपल्याला सहजपणे उपलब्ध होणारे फळ आहे. चिकू खाण्याचे फायदे अनेक आहेत. चिकू खाल्ल्यानं पित्ताशय चांगलं राहातं इतकच नाही तर रोगप्रतिकारकशक्ती वाढते.नियमितपणे चिकू सेवन केल्यानं स्नायू आणि हाडे मजबूत राहतात आणि कर्करोग सारख्या गंभीर आजाराचा धोका देखील कमी होतो. चिकूचा गुणधर्म हा थंड असून बऱ्याचदा डॉक्टर आपल्याला निरोगी राहण्यासाठी ऋतूनुसार फळ खाण्याचा सल्ला देतात. चिक्कू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. आरोग्यासाठी चक्कू हे फळ फार उपयोगी आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.चिक्कूचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota) असं आहे. चिकू खाल्ल्यानं पित्ताशय चांगलं राहातं. नियमितपणे चिकू सेवन केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत राहतात आणि कर्करोग सारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो.

चिक्कूचे फायदे…

1. चिकूमध्ये व्हिटामिन अ आणि ब जीवनसत्व असतात. लोह, कॅल्शियम, फायबर, अॅन्टी ऑक्सिडाइज सारखे घटक असतात. यामुळे चिक्कू या फळाचे नियमित सेवन केल्यानं कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. शिवाय शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
2. चिकू हे फळ डोळ्यांसाठी देखील फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं. या फऴामध्ये अ जीवनसत्व असल्यानं डोळ्यांसाठी हे फळ फार फायदेशीर आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण याचं सेवन करू शकतात.
3. चिकू खायलाही चांगला आणि शरीरासाठी गुणकारी आहे. रोज एक चिकू खाल्ल्यानं आपलं सौंदर्य आणि त्वचा अधिक चांगली राहू शकते. अॅन्टी ऑक्सीडेंट, अॅन्टी व्हायरल असे या फळात गुण असतात.
4. आजकाल काम आणि इतर टेन्शनमुळे आपण रोज थकत असतो. आपला थकवा दूर करण्यासाठी डॉक्टर भरपूर फळांचं सेवन करण्याचा सल्ला देतात.
या फळांमध्ये रोज चिकूचाही समावेश केला तर तणावापासून आपण दूर राहू शकतो. चिकूमधून आपल्याला ऊर्जा मिळते.
5. तापाची समस्या असेल तर चिकूचं सेवन करावं. थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *