Sun. Jun 20th, 2021

महिलांमधील कर्करोगाच्या उपचारासाठी अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. या कर्करोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये स्तनाच्या आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. या कर्करोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले आहे. याचे लोकार्पण मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल देखील उपस्थित होते.

कर्करोगांवर नियंत्रण आणणे गरजेचं

जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव, स्तनाच्या कॅन्सरच्या प्राथमिक लक्षणांबाबत अपुरी माहिती यामुळे कर्करोगामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

वैद्यकीय चाचण्यांबाबतच्या जागृतीचा अभाव तसेच तपासणीसाठी आवश्यक सोयीसुविधांची उपलब्ध नसल्याने यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाची योग्य तपासणी करणे शक्य नव्हते.

या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने महिलांना कर्करोगाची तपासणी तात्काळ करून योग्य उपचार घेण्यात यावा म्हणून ही मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कर्करोग प्राथमिक अवस्थेत ओळखता आला तर पूर्ण बरा होऊ शकतो. लवकर निदान झाल्यास साध्या उपचारांनीही हा आजार बरा करता येतो.

सर्व विवाहित स्त्रियांनी ठाणे महापलिकेच्या या मोबाईल व्हॅनमधील अद्ययावत यंत्रणेद्यारे तपासणी करून घेण्याचे आवाहन महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

नियमित तपासणी, जागरूकता, योग्य उपचार असतील तर गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकते म्हणून महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये या मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

या व्हॅनची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून संपूर्ण तपासणी मोफत असणाऱ्या या तपासणीचा प्रत्येक सोसायटीमधील महिलांना याच लाभ घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *