Sun. Aug 1st, 2021

पूरस्थितीत आरोग्याची घ्या अशी काळजी…

मुसळधार पावसामुळे राज्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.मागील दोन दिवसांपासून काही ठिकाणी पाऊस ओसरला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र यानंतर पूर परिस्थिती असताना आणि पूर परिस्थिती ओसरल्यानंतर अनेक साथीचे आजार पसरतात.

मुसळधार पावसामुळे राज्यात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.मागील दोन दिवसांपासून काही ठिकाणी पाऊस ओसरला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र यानंतर पूर परिस्थिती असताना आणि पूर परिस्थिती ओसरल्यानंतर अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये प्रामुख्याने कॉलरा, हिवताप, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, उलट्या, जुलाब, टायफॉईड, स्वाइन फ्ल्यू यासारखे आजार पसरत असतात. साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया हे आजार पसरतात. या काळात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

पूरस्थितीत आरोग्याची काळजी

पाणी पिताना फिल्टरचे पाणी प्या किंवा चार पदरी फडक्याने पाणी गाळून, उकळून घ्या. त्यानंतर गार करून ते पाणी प्या

हॉटेल, रेस्टॉरंटमधील पाणी पिण्याचे टाळा, सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचे टाळा, बाहेर जाताना घरातून पाणी घेऊन जा

उघड्यावरचे अन्न खाणे टाळा, कारण त्यातून रोगराई पसरते

शक्यतो पावसात भिजू नका, भिजल्यानंतर लवकरात लवकर अंग कोरडे करा

अंग ओले राहिले तर सर्दी खोकल्याबरोबरच फंगल इफेक्शन, पायाला चिखल्या, गजकर्ण यासारखे आजार पसरतात

पावसाळ्यात ढगाळ हवामानामुळे न्यूमोनिया, सर्दी. खोकला, स्वाइन फ्ल्यू यासारखे साथीचे आजार पसरतात

शाळेत जाणाऱ्या मुलाला ताप आल्यानंतर लगेच बरे वाटले म्हणून लगेच शाळेत पाठवू नका, अर्धवट बऱ्या झालेल्या मुलांपासून इतर मुलांना हा आजार होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *