Mon. Jan 17th, 2022

भूकंपाच्या धक्क्यामुळे आरोग्य केंद्र हलवलं, नागरिकांची फरफट!

राहुल पाटील, पालघर

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी या भागाला लहान-मोठे भूकंपाचे हादरे बसत आहेत. या भूकंप प्रवण क्षेत्राचा केंद्रबिंदू असलेलं धुंदलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहे. भूकंपाचं (Earthquake in Palghar) कारण देत हे प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाने विस्थापित केलं असलं, तरी यामुळे धुंदलवाडीसह परिसरातील नागरिक तसंच रुग्णांना पायपीट करावी लागतेय. 

भूकंपाच्या हादऱ्यांमुळे धुंदलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (Health center) धुंदलवाडी पासून पाच ते सात किलोमीटरवर असलेल्या बहारे या गावी हलवण्यात आलंय.

त्यामुळे धुंदलवाडी गावाच्या मुख्य बाजारपेठेत असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तसेच येथील सोयीसुविधा धूळ खात पडल्या आहेत.

भूकंपाच्या हादऱ्यांच कारण देत शासनाने हे प्राथमिक आरोग्य केंद्र हलवलं असलं तरी त्यामुळे धुंदलवाडीसह परिसरातील नागरिकांची तसेच रुग्णांची मोठी हेळसांड होताना पाहायला मिळते.

वारंवार बसणाऱ्या हादऱ्यांमुळे या भागाला अनेक सत्ताधारी आणि विरोधकांनी भेटी दिल्या त्यावेळी येथील आरोग्य यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणा सक्षम करू असा आश्वासनही राजकीय पुढाऱ्यांकडून मिळालं. मात्र येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इतरत्र हलवून येथील जनतेची चेष्टाच केल्याचं वाटतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *