शाळा सुरू करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे संकेत

राज्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढू लागल्यामुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुन्हा शाळा सुरू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. बुधवारी पार पडणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरू करण्यावर चर्चा होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरीही ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असेल त्या जिल्ह्यात शाळा सुरू करण्यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना, ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळे पुन्हा शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संस्था आक्रमक झाल्यानंतर बुधवारच्या मंत्रिमंडळात शाळा सुरू करण्यावर चर्चा होणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत मागणी केली जात आहे. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी असतील त्या ठिकाणी शाळा सुरू करण्यावर चर्चा होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
Awesome website man, looks very nice. Finally found what Ive been looking for, thanks!