Jaimaharashtra news

कोरोना झाल्यानंतर आरोग्य निरोगी कसं राहील…

भारतात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णालयात बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजन, औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता ही भासत आहे. तसेच , अनेक रुग्ण हे व्हायरसमधून मुक्त होत आहेत. रुग्ण बरे झाल्यावर घरी परतात त्यानंतर शरीरत कमजोरी ही येते. आरोग्य सुदृढ आणि कोरोनाच्या नवीन स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजणांनी अतिशय काळजी घेतली पाहिजे. आपला आहार हा पौष्टिक असायला पाहिजे. आहारात जर या पौष्टिक गोष्टी असेल तर शरीर हे निरोगी राहते.

फळे : आपल्या नाश्त्यामध्ये डाळींब, सफरचंद, पपई, किवी, पिस्ता, बदाम, ब्रोकली, यासारख्या विविध प्रकारच्या फळांचा समावेश करा. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरातील कमजोरी दूर होण्यास मदत होते.

प्रोटीनयुक्त भोजन :  अंडी, दुग्धजन्य पदार्थ, मासे, जामुन असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने आजारातून लवकर रिकव्हर होण्यास मदत होईल. तसेच, व्हिटॅमिन सी, मल्टीविटामिन आणि झिंकच्या गोळ्या घेत रहा कारण यामुळे आपल्या शरीरातून विष बाहेर पडण्यास मदत होते. झिंक हे कवड्याच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे झिंक हे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

पाणी : पाणी हे भरपूर प्रमाणात प्या ज्यामुळे आपलं आरोग्य निट राहील.

व्यायाम करा : आहाराबरोबर शरीरासाठी व्यायमही तितकाच गरजेचा आहे. श्वासोच्छवास चांगले ठेवण्यासाठी श्वसनाशी संबंधित व्यायाम करा.

Exit mobile version