Tue. Dec 7th, 2021

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? या महत्त्वाच्या खास आयुर्वेदिक टिप्स

उन्हाळा म्हटलं तर विविध आजार आलेच. त्यातच हळुहळु सूर्य़ाच्या तापामुळे उष्णतेत प्रचंड वाढ होते. आधीच शिशिर ऋतूतील थंडगार वातावरणामुळे साचलेला कफ हळूहळू पातळ होतो. जठराग्नी (पचनशक्ती) मंदावते. परिणामी अतिरिक्त उष्णतेमुळे शरीरातील कफ कमी होतो आणि वात वाढू लागतो. डॉ. वैशाली सावंत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्यात पित्ताचा त्रास, अँसिडिटी तसेच डोकेदुखी इत्यादी अपचनाशी संबंधित विकार वाढत असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळावधीत स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल आयुर्वेदात काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत.

उन्हाळी आजारांपासून वाचण्यासाठी काही खास उपाययोजना –

१) आहार – गहु, जुने तांदूळ, मुग या धान्यांचा आहारात समावेश करावा. नवीन धान्य कफ वाढवतात तसेच पचनशक्ती कमी करतात म्हणून त्यांचा रोजच्या आहारात समावेश करू नये. नाईलाजाने नवीन धान्य खावे लागल्यास ते धान्य आधी भाजवून घ्यावे. जेणेकरून ते पचनास हलकी होतात. जास्त हालचाल करणाऱ्या प्राण्यांचे मांस खावेत.

२) पेय – नागरमोथा(मूस्ता) व सुंठीचा काढा – कफशामक

• डाळंबाचे सरबत – पित्तशामक

• नवीन मातीच्या भांड्यात ठेवलेले वाळा तसेच खसाच्या सरबताचे सेवन करावेत

• नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

३) विहार – उन्हाळ्यात सुरूवातीला हलका व्यायाम करावा. उष्णता वाढत राहिल्यास व्यायाम करणे कमी करावेत., उन्हाळ्यात बाहेर फिरणे टाळावेत, दिवसा झोपू नयेत, कपूर चंदनाचा कपाळावर लेप लावावा, नदी किंवा विहिरीमध्ये पोहावे, हलके आणि पातळ वस्त्रे परिधान करावेत. शीतल करंज्याच्या संपर्कात रहावे.

४) योग – शीतली-शीतकारी-शरीरातील उष्मा नियंत्रण करणारा योगाभ्यास करावा.

५) उपाय –

• सैंधवमिठयुक्त पाणी सकाळी उपाशीपोटी वैद्यांच्या सल्ल्याने घेऊन वितळणारा कफ बाहेर काढावा.

• कफाच्या पोकळ्यांमध्ये साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी औषधी द्रव्यांचे धुम्रपान (धूर घेणे) करावे.

• मीठ तसेच हळदीच्या पाण्याने गुळण्या कराव्यात

• औषधीसिद्ध तेलांचे रोज नाकात दोन-दोन थेंब टाकावेत.

• विविध आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वरील सर्व उपाययोजना संबंधित व्यक्तींनी आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी.

• दीर्घकालीन डोकेदुखी, अँसिडीटी पित्तासाठी शास्त्रोक्त पंचकर्माची मदत घ्यावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *