Mon. May 10th, 2021

महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर सुप्रीम कोर्टात आज सकाळी 11.30 वाजता सुनावणी

शनिवारी महाराष्ट्राच्या इतिहासात अकालनीय अशी घटना घडल्याने राजकीय वर्तुळात भुकंप निर्माण झालाआहे. या पाश्वभुमीवर अनेक स्तरावरून अनेक प्रकारच्या प्रतिक्रीया उमटत आहेत.

दरम्यान बहूमत नसूनही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी त्वरित संधी दिली. तसेच अत्यंत कमी कालावधीत त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथही दिली.

राज्यपाल व राष्ट्रपतीपदाच्या सर्वोच्च व घटनात्मक पदांचाही आपल्या स्वार्थासाठी वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारची प्रतिक्रीया सर्व स्तरातून उमटत आहे.

खुद्द राज्यपालांनीच देशातील संसदीय लोकशाहीचा उपहास केला आहे’, अशा तीव्र शब्दांत आक्षेप घेऊन तिन्ही पक्षांनी शनिवारी संध्याकाळी तातडीने सर्वोच्च न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

आज रविवार सुट्टीचा वार असूनही या याचिकेवर सकाळी ११.३० वाजता तात्काळ सुनावणी होणार आहे.

तसेच सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे याविषयी सुनावणी होण्याची शक्यता दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *