Tue. Jun 28th, 2022

वकील गुणरत्न सदावर्तेंच्या कोठडीवर सुनावणी

उच्च न्यायालयाने एसटी संपाबाबत दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संपकारी कर्माचीर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडकले. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या अटकेवर न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत आणखी तीन वकील आहेत. तसेच न्यायालयाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

सदावर्ते यांच्यावर दाखल झालेल्या तक्रारीतील धक्कादायक खुलासे

गुणरत्न सदावर्तेंनी ७ एप्रिलला चितावणीखोर भाषण केलं.

शरद पवारांच्या घरी घुसून जाब विचारू’ सदावर्तेंचं वक्तव्यं

काही आंदोलनकर्त्यांनी मद्य प्राशन केलं होतं

आंदोलक ओक ‘सिल्व्हर ओक’ला जाणार असल्याची माहिती

सदावर्तेंवर दाखल करण्यात आलेले गुन्हे?

कलम १४३ – जमाव गोळा करणे.

कलम १४५ – जमावाचा अप्रत्यक्ष भाग होणे.

कलम १४७ – जमावाला भडकवणे.

कलम १४९ – जमाव गोळा करण्यासाठी नियोजन करणे.

कलम ३५३ – सरकारी कामात अडथळे.

कलम ३३२  – सरकारी कर्मचाऱ्यांना घाबरवणं किंवा धमकी देणं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.