Wed. Jun 16th, 2021

मेहुल चोक्सीविरोधात डोमिनिका न्यायालयात सुनावणी

पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याच्या विरोधात डोमिनिका न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे. चोक्सीविरोधात इंटरपोलनेही रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.सुनावणीत चोक्सीचं प्रत्यार्पण भारतात होऊ शकतं का, या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. मेहुल चोक्सी याला डोमिनिका येथील सीआयडीने ताब्यात घेतले आहे.

मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी आठ अधिकाऱ्यांची टीम सध्या डॉमिनिकामध्ये आहे. पीएनबी बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या प्रमुख शारदा राऊत या टीमचे नेतृत्व करत आहेत. शारदा राऊत यांनीच पीएनबी घोटाळ्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. डॉमिनिकामध्ये पोहोचलेल्या ८ सदस्यांच्या या टीममध्ये सीबीआय, ईडी आणि सीआरपीएफचे दोन दोन अधिकारी आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *