Fri. Sep 30th, 2022

राऊतांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होणार आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतरच संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर बुधवार मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. परंतु वाहतूक कोंडीमुळे राऊत यांना कोर्टात पोहचायला उशिर झाला. संजय राऊतांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जवळजवळ दीड तास उशिराने हजर करण्यात आले. पण, यापूर्वीच संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी घेण्याचं कोर्टाकडून निश्चित करण्यात आलं होतं.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत काल मंगळवारी एकत्रित सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाकडून संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढवली. आता संजय राऊतांना ४ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात येणार आहे. मुंबईतील गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं. १०३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा या आरोपपत्रातून ईडीने केला आहे.

2 thoughts on “राऊतांच्या जामीन अर्जावर २७ सप्टेंबरला सुनावणी

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.