नागपुरात उष्णतेची लाट

नागपुरात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नागपुरात चार दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. नागपुरात पारा ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
उत्तर भारतातील मुख्यत्वे राजस्थानमधून उत्तर-पश्चिमेच्या दिशेने येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. नागपूरसह अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील तापमानातही वाढ होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध शीतपेयांचा आधार घेत असून व्यापाऱ्यांनी दुकानात हिरव्या जाळ्यांचे शेड उभारून उन्हापासून बचाव करतांना दिसत आहेत.
Simply wanna comment on few general things, The website style is perfect, the written content is real good : D.