Wed. Jun 29th, 2022

नाशकात उन्हाच्या झळा

नाशकात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. देशासह राज्याला उन्हाचा चटका बसत असून महाराष्ट्रात २५हुन अधिक शहरांत पारा ४१ अंशाच्या वर सरकला होता. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नाशिककरांना उन्हाचा फटका बसतो आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. विदर्भात मात्र यानंतरही उकाड्याची लाट कायम राहणार आहे. या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांनी वाढण्याची शक्यता असेल अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितले आहे. आगामी आठवड्यात राज्यातील उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार आहे.
काही भागांत पावसाची शक्यता

तर, पुढील ४८ तासात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात व संलग्न भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर पुढील पाच दिवस विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.