Sat. May 15th, 2021

अंधेरीतील रोल्टा कंपनीला भीषण आग

मुंबईतीत अंधेरीत एका कंपनीला भीषण आग लागली आहे. अंधेरी पूर्वेतील एमआयडीसी येथील आयटी कंपनीला भीषण आग लागली आहे.

एमआयडीसीमधील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला ही आग लागली आहे. दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागली आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निश्मन दलाच्या एकूण १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सुदैवाने या इमारतीत कोणीही अडकलेलं नाही. आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. दरम्यान गेल्या अडीच तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

युद्धपातळीवर आग विझवण्याच काम सुरु आहे. ही आग भीषण असल्याने नियंत्रण मिळण्यासाठी वेळ लागत आहे. ही आग लेवर ३ प्रकारची असल्याचं अग्निश्मन दलाकडून सांगण्यात येत आहे.

एमआयडीसी, सीप्झ हा परिसर औद्योगिक परिसर आहे. यामुळे येथे आगीची मालिका सुरुच असते. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात याच ठिकाणी असलेल्या कामगार रुग्णालयाला आग लागली होती.

तसेच या भागातील आकृती ट्रेड सेंटर या इमारतीला २०११ साली आग लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *