Mon. Aug 26th, 2019

पुढील 3 दिवस सातारा कोल्हापूर, सांगलीमध्ये अतिवृष्टीचा इशारा

0Shares

पुढील तीन दिवस सातारा कोल्हापूर, सांगलीमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिलीय. सांगली, कोल्हापूर मध्ये पूरस्थिती गंभीर आहे. कोयना धरणातील विसर्ग कमी झाल्याने कराडमधील पाणी कमी झालं आहे. त्यामुळे साताऱ्यातील पूरस्थिती कमी झालीय. तर भीमा नदीमध्ये पाण्याची परिस्थिती सुधारली आहे.

मुबंई- बेंगलोर महामार्गावर कोल्हापूर येथे पाणी आल्याने वाहतूक संपूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

तसंच आत्तापर्यंत बेळगाव-कोल्हापूर, सांगली- कोल्हापूर , पुणे- कोल्हापूर हे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत.

आत्तापर्यंत 1,32,360 जणांना स्थलांतरित केलं गेलंय. तर जवळपास 2,56,755 नागरिकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

एकूण NDRF च्या एकूण 11 ते 12 टीम तीन जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

सांगलीत 18 गावांचा संपर्क तुटला तर साताऱ्यात 6 गावांत 800 लोकांचा संपर्क तुटलाय.

कोल्हापूरमध्ये देखील 18 गावांचा संपर्क तुटलाय.

पुणे विभागात आत्तापर्यंत 137% पाऊस झालेला आहे.

सर्व धरणं पूर्ण भरली असून आणखीन पाऊस झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढवला जाईल. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं, अशी सूचना देण्यात आलीय. पाचही जिल्ह्यांत आत्तापर्यंत पुरामुळे 16 जणांचा मृत्यू झालाय. राज्य सरकार आणि सर्व यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलंय.

आत्तापर्यंत पुणे विभागात 1लाख ३२ हजार ३६० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलय.

पुणे – 13336

कोल्हापूर – 51785

सातारा – 6262

सांगली – 53228

सोलापूर – 6500

 

सांगलीमध्ये

NDRF च्या 5 तुकड्या,

11 बोटी

28 खासगी बोटी

2 पिपरी चिंचवड महापालिकेच्या बोटी

कोल्हापूरमध्ये

NDRF च्या 6 तुकड्या

7 बोटी

41 खासगी बोटी

160 जवान

कोल्हापुरात हवाईमार्गे नेव्हीच्या 2 टीम गोव्याहून दाखल.

साताऱ्यामध्ये

NDRF 1 तुकडी

10 बोटी

22 जवान

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *