Tue. Aug 9th, 2022

नागपुरात अतिवृष्टीचं संकट

नागपूर विभागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नागपूर जिल्ह्यात २८ हजार हेक्टरसह नागपूर विभागात तब्बल २ लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर ३५० हेक्टर वरील शेतातील सुपीक जमीन पिकांसह पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. शासनातर्फे नुकसानग्रस्त शेतपिकांचे युद्धपातळीवर पंचनामे करण्यात येत आहे. नागपूर विभागातील तहसील कार्यालयातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. येत्या ८ ते १० दिवसात पंचनाम्याचे कार्य पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर त्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. ८७८ गावांतील ११ हजार कुटुंबांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. ६९ हजार ७१८ हेक्टर शेत जमिनीवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने शेती खरडून निघाली आहे. ज्यांनी पेरले त्यांचे पीक गेले, ज्यांनी दुसऱ्यांदा पेरले त्यांचेही नुकसान झाले आणि ज्यांनी पेरलेच नाही त्यांची आता पेरण्याची हिम्मतच उरली नाही. हिंगणघाट, आर्वी, आष्टी, समुद्रपुर, सेलू तालुक्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. तब्बल ८७८ गावे बाधित झाली आहे. तर याचा फटका ११ हजार ८६९ कुटुंबांना बसलाआहे. वर्धा, हिंगणघाट आणि समुद्रपुर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतजमीन खरडून गेली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने जमीन अजूनही ओली आहे. अशा जमिनीवर पिके तग धरू शकणार नाही असाच अंदाज व्यक्त होत आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे संकट ओढवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.