Tue. Dec 7th, 2021

कोल्हापूरची पूरस्थिती बिकट, पुणे-बेंगलोर महामार्ग बंद

कोल्हापूरची पूरस्थिती बिकट होत चालली आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने काही गावांत पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोल्हापूरची पूरस्थिती बिकट होत चालली आहे. पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने काही गावांत पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ज्या गावांत पाणी शिरले त्यातील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पाऊसाची संततधार अजूनही सुरूच आहे.

कोल्हापूरची पूरस्थिती बिकट

पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने काही गावांत पाणी शिरले आहे. सुमारे दहा हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापुरमध्ये दाखल झाले आहेत.

कोल्हापूरमधील पराचे पाणी पुणे-बेंगलोर महामार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. बेंगलोरला जाणारी वाहने किणी,तर पुण्याकडे जाणार वाहने कोगणोळी टोल नाक्यावर थांबवण्यात आली आहे.

पाण्याची आवक जास्त असल्याने राधानगरी धरणाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील 107 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे शहर पाण्यात गेली असून मुसळधार पावसामुळे पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफकडून रेस्कू ऑपरेशन सुरू

पंचगंगा नदीची पाणीपातळीत 50 फूट 9 इंचावर पोहचली आहे. 2005 पेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर नागरिकांचे स्थलांतर सुरू असून कोल्हापूरचा मुंबई,पुणे,कोकणाशी संपर्क तुटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *