Sun. Jun 20th, 2021

येत्या 48 तासात महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता

महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरवात झाली असुन येत्या ४८ तासात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. शनिवार पासून महाराष्ट्रात काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. 

महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरवात झाली असुन येत्या ४८ तासात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. शनिवार पासून महाराष्ट्रात काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे.

पूर्वमध्य अरबी समुद्रावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय वात स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार सरी आणि मेघगर्जनेची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात सोमवारपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे बुधवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर  मंगळवारपर्यंत पुण्यात, मराठवाड्यात उस्मानाबाद, बीड येथे  सोमवारपर्यंत ही शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये रविवारी मेघगर्जना, विजा आणि जोरदार वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. काही दिवसांच्या  विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लेवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *