परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान

महाराष्ट्रात परतीच्या पावसाने थैमान घातलेले आहे. महाराष्ट्रात 2-3 दिवसापासून अनेक ठिकठिकाणी पाऊसाने हजेरी लावलेली आहे. रात्रीपासुनच मुंबई,ठाणे,नवी मुंबई मध्येही विजेच्या कडकडांसह मुसळधार पाऊस पडत होता. कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असल्यानं आजही मुंबई, ठाणे, उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई हवामान विभागाचे उपमहसंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई,ठाणे कोकणासाठी रेड अलर्ट तर रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच सकाळी 7 वाजतापासून मुंबई किनारपट्टीवर ढग दाटून आल्याचं सांगितलं.

प्रशासनाकडून नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

या पावसामुळं कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने आधीच सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच मच्छीमारांनाही महाराष्ट्र व दक्षिण गुजरातच्या सीमेसह 15 ऑक्टोंबरनंतर 3 दिवस समुद्रामध्ये जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.

Exit mobile version